द्याने गावाची माहिती
द्याने गावाचा इतिहास –
आमच्या ग्रामपंचायतीचे नाव दयाने ता. बागलाण जि. नाशिक आहे. ते मौसम नदीच्या काठावर वसलेले आहे. व गावाला संरक्षण म्हणुन मोठी लांब भिंत्त बाधण्यात आली आहे. नामपुर ते ताहाराबाद रोड लगत असलेले खेडे गाव आहे. तसेच ग्रामपंचायतीची स्थापना ३०/०९/१९५७ या साली झाली. बागलाण तालुक्याती द्याने गावातील पहिले शास्त्रज्ञ श्री. कै. दत्तु गोपाळ कापडणीस हे शेतकरी कुंटूबातील प्रज्ञावंत व्यक्तीमहत्व होऊन गेले ते भौतिकशास्त्राचे एम.एसएस्सी आणि लायडण विद्यापिठाचे डी.एसएस्सी ही सर्वोच्च पदवीधर, भारतीय विज्ञान संस्थेचे फेलो, इस्टीट्युट ऑफ इंजिनियर्स असोसियटमेंबर व महाराष्ट्र शासनाचा वर्ग- १ सेवेत कार्यरत होते. फोटोग्राफी हा त्यांचा आवडता छंद होता. १९४२ च्या स्वातंत्र लढ्यात विद्यार्थी दशेत असतांना त्यांनी सटाणा पोलीस चौकीत स्वत: तयार केलेले हॅंड बॉम्ब उडवून आंदोलनात भाग घेतला होता. स्वांतत्र्य पूर्व काळात मराठा हायस्कूल, सटाणा येथे माध्यमिक शिक्षकाचा पेशा पत्कारूण सामाजिक व राजकीय क्षेत्रात भरीव कार्य केले. स्वातंत्र्य काळात आपली वयक्तीक ज्ञान पिपासा भागवताना बडोदा विद्यापिठात प्राध्यपक कार्य अंगीकारून, तसेच दिल्लीच्या नॅशनल लॅबोरेटरीत उष्णता अभिसरण बाबत व लायडनपच्या आईन्स्टॅइनच्या कमलीन लॅबोरेटरीत अतिशीत तपमान शाखेत उच्च प्रतीचे संशोधन करून डॉ. ऑफ सायन्स हि पदवी संपादून अनेक संशोधन प्रबंद प्रसिद्ध केलेत फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, बेल्जीयम या देशात भेट देऊन आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचे प्रतिनिधत्व केले. कै. डॉ कापडणीस यांनी संपूर्ण व्यासंगनातर बागलाणच्या स्थानिक राजकारणात भाग घेतला होता, त्यातूनच मराठी लेखनाचा पिंड अथवा कायदा किंवा राज्यशास्त्राचे अभ्यासक नसतांनाही चिकीत्सक भुमिकेतुन पंचायतराज्य हे दोन उद्बोधक ग्रंथ लिहुण १९६४ चे महाराष्ट्रशासनाचे प्रथम पारितोषिक मिळवले होते. तसेच गावात राम मंदीर, हनुमाण मंदीर, खंडेराव मंदीर, दत्त मंदीर आहेत. तसेच समाज मंदीर व पशुवैदयकीय दवाखाना आहे उपआरोग्य केंन्द्र आहे. जि.प्रा. शाळा व हायस्कुल आहे. तसेच अंगणवाडी, तसेच तीन पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. दयाने हे गाव अतिशय सुशिक्षीत असुन शिक्षकांची संख्या जास्त आहे. गावातील मुख्य पिक ऊस, डाळींब, कांदा, द्राक्ष हे मुख्य पिके घेतली जातात. तसेच आमचे गा शंभ्भर टक्के तंटामुक्त झालेले आहे. तसेच आमच्या गावात दारू व गुटखा बंदी करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायतीने केलेली कामे खालीलप्रमाणे –
1. 92% हागणदारी मुक्त गाव केले आहे.
2. भारत निर्माण पाणीपुरवठा योजनेचे काम पुर्ण केले.
3. पर्यावरण ग्रामसंतुलीत योजनेत यशस्वीरित्या सहभाग.
4. एम. आर. इ. जी. एस. अंतर्गत वृक्षलागवड व संगोपन.
5. स्मशानभुमी सुशोभीकरण केले.
6. प्रधानमंत्री आवास योजना यशस्वीपणे राबवली.
7. गावांतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण झाले.
8. पाण्याचे दोन टंकर घेतले आहेत.
9. कचरा संकलनासाठी घंटा गाडी घेतली आहे.
10. मोसम तीरी सभामंडप बांधकाम आहे.